धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात वृक्ष छाटणी, धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण या कामांना सुरुवात होत असते. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच शहरातील धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.

पावसाळापूर्व खबरदारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरातील धोकादायक, अतिधोकादायक, तसेच वीज वाहिन्यांखालील झाडांची छाटणी करण्यात येते. त्याकरिता महापालिका आधीच शहरातील धोकादायक वृक्षांची यादी जाहीर करते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वृक्षांची छाटणी केली जाते. पावसाळा सुरू झाला की शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नित्याच्याच असतात. त्यासाठी महापालिका धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करते व पावसाळापूर्वीच छाटणी केली जाते. मागील काही वर्षांत सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पावसामुळे शहरातील 20 ते 25 वर्षे जुनी झाडे उन्मळून पडली होती. काही भागातील झाडांची पडझड झाली होती. मोठ्या प्रमाणावर वृक्ष हानी झाली होती.

मागील वर्षी 142 वृक्ष धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होते. मे अखेरपर्यंत वृक्ष छाटणी पूर्ण झाली होती. या अनुषंगाने यंदा एप्रिलमध्येच धोकादायक वृक्ष सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येईल.

नितीन नार्वेकर, उद्यान विभाग उपायुक्त
Exit mobile version