पोलादपूर तालुक्यातील गावठाणाचे भूमापन आता ड्रोनद्वारे

उपअधिक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचा निर्णय
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील उपअधिक्षक भूमीअभिलेख कार्यालय, पोलादपूरमार्फत 16 मे 2022 पासून ड्रोनद्वारे गावठाण जमिनींचे सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. भूमीअभिलेख कार्यालय सुरू झाल्यापासून सातबारा जमिनींवरील मालकांऐवजी प्रॉपर्टी कार्डावर भलत्याच मालकांची नोंद करण्यात आल्याच्या घटनांमुळे अनेकांना वर्षानुवर्षे कोर्टकचेर्‍यांचे खेपा माराव्या लागल्या आहेत.

16 मे रोजी लोहारे, पार्ले, हावरे, दिविल, तुर्भे बुदू्रक, 17 मे रोजी माटवण, कणगुले, सवाद, वावे, धारवली, 18 मे रोजी कालवली, आंग्रेकोंड, तुर्भेकोंड, तुर्भेखुर्द, वझरवाडी, 19 मे रोजी चरई, काटेतळी, सडवली, चोळई, धामणदेवी सुतारवाडी, धामणदेवी, 20 मे रोजी भोगाव खुर्द, भोगाव बुद्रुक, कातळी, कोंढवी, फणसकोंड, 21 मे रोजी खडकवणे, गोलदरा, महालगूर, पळचिल आणि ओंबळी, दि. 23 मे रोजी रानबाजिरे, मोरगिरी फौजदारवाडी, मोरगिरी, खडपी, गांजवणे, 24 मे रोजी देवपूर, देवपूरवाडी, गोळेगणी, पांगळोली, पैठण, दि.25 मे रोजी तुटवली, परसुले, क्षेत्रपाळ, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, कोतवाल खुर्द, कुडपण खुर्द, कुडपण बुद्रुक, दि. 25 मे रोजी कापडे बुद्रुक, महाळुंगे, चांभारगणी खुर्द, चांभारगणी बुद्रुक, निवे, दि. 27 मे रोजी ताम्हाणे, किनेश्‍वर, कापडे खुर्द, रानकडसरी, केवनाळे, दि.30 मे रोजी वाकण, नाणेघोळ, रानवडी बुद्रुक, घागरकोंड, बोरावळे, दि. 31 मे रोजी देवळे, हळदुळे, दाभिळ, लहुळसे, लहुळसे, करंजे, दि.1 जून रोजी बोरज, उमरठ, साखर, साळवीकोंड, गोवेले, दि. 2 जूनरोजी खांडज, चांदके, खोपड, खोपड, ढवळे, चांदले, दि. 3 जूनरोजी चिखली, आडावळे बुद्रुक, आडावळे खुर्द, मोरसडे, नावाळे, दि. 4 जून रोजी सडे, बोरघर, वडघरबुदु्रक, कामथे असा ड्रोनद्वारे गावठाण जमिनींचे सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम अधिकृतरित्या पोलादपूर उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयामार्फत जाहिर करण्यात आला असून यात भुमिअभिलेख उपअधिक्षक कार्यालयाचे कर्मचारी आणि चुना मागिची तारिख अशी माहिती देण्यात आली आहे.

पोलादपूर तालुक्यातील संबंधित तारखेला संबंधित गावांतील ग्रामस्थांनी या ड्रोनद्वारे सर्वेक्षणप्रसंगी उपस्थित राहून काही चुकीचे चालले नसल्याची खात्री करून चुकीचे सर्वेक्षण होत असल्यास तातडीने हरकत घेण्याची गरज असून कोणी तोंडी माहिती देत असल्यास ती खोटी अथवा चुकीची असल्यास तशा पध्दतीने लेखी हरकत घेऊन सुधारणा करण्यास भाग न पाडल्यास पोलादपूर उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयातील या अचानक होणार्‍या बदलांवर जिल्हा भुमिअभिलेख अधिक्षक यांच्या न्यायालयात दाद मागावी लागून सातबारा उतारा असलेल्या मालकाला मोठया प्रमाणात आर्थिक भुर्दंड व मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याने या सर्वेक्षणावर सर्वांनीच बारकाईने लक्ष ठेऊन काटेकोरपणे ड्रोनद्वारे गावठाण जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची खात्री करण्याची गरज आहे.

Exit mobile version