| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका 23 नोव्हेंबरपासून खेळविण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
विशाखापट्टणमव्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून खेळवले जातील.
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाचा संघ:मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, ॲडम झम्पा.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक पहिला सामना- 23 नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम. दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम. तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी. चौथा सामना- 01 डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर. पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.