| लखनऊ | प्रतिनिधी |
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंटस यांच्यामध्ये काल लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मॅच पार पडली. या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव मोक्याच्या क्षणी केवळ 7 धावा करुन बाद झाला. सूर्यकुमार यादवकडून मुंबईला मोठी अपेक्षा होती, मात्र तो लखनऊ सुपर जाएंटस विरुद्ध चांगली कामगिरी करु शकला नाही. लखनऊच्या यश ठाकूरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं षटकार लगावण्याच्या प्रयत्नात मारलेला फटका थेट स्टंपवर जाऊन आदळला.
सूर्यकुमार गुडघ्यावर बसून स्टंपच्या मागं षटकार मारायचा होता मात्र तो फटका मारल्यानंतर बॉल थेट स्टंपला वर जाऊन आदळला. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवनं या शॉटच्या सहाय्यानं भरपूर धावा केल्या होत्या. यश ठाकूरच्या गोलंदाजीवर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. ठाकूरनं यावेळी हुशारी दाखवली आणि बॉलचा वेग कमी ठेवत दिशा बदलली. त्यामुळं सूर्याचा प्रयत्न फसला. सूर्यकुमार यादवनं जागा सोडून स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो फसल्यानं बॉल स्टंपवर जाऊन आदळला. सूर्यकुमार यादव केवळ 7 धावा करु शकला. 9 बॉलमध्ये तो केवळ 9 धावा करु शकला.