सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय विक्रम
| सुधागड-पाली | वार्ताहर |
ठाण्यातील विटाव्यात राहणारी सुधागड तालुक्यातील वाघोशी गावची सुकन्या पॉवरलिफ्टर चॅम्पियन सुश्मिता सुनील देशमुख हिने केरळ येथील अल्लापुझा येथे पार पडलेल्या सब ज्युनिअर-सिनिअर मास्टर क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेतील 52 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपद जिंकले. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कल्याणच्या कारभारी जिमची खेळाडू असलेल्या सुश्मिताने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी पताका फडकविली आहे. तिची जून 2022 मध्ये होणार्या आशियाई स्पर्धेमध्येही निवड झाली आहे.
अल्लापुझा केरळ येथे सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, मास्टर, क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली. सुश्मिता सुनील देशमुख हिने सिनियर गटामध्ये 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक तसेच नॅशनल रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान म्हणजे स्ट्राँग वोमन ऑफ इंडिया 2022 पटकावला. जूनमध्ये होणार्या आशियाई स्पर्धेमध्ये निवड सुश्मिताची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग क्लासिक सब जुनियर, जुनियर-सीनियर मास्टर स्पर्धा कामगार क्रीडा भवन कल्याण मंडळ, प्रभादेवी, मुंबई येथे दि. 5 ते 6 मार्च 2022 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत देशाच्या विविध भागातून 1500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ती कल्याणच्या कारभारी जिममध्ये विनायक कारभारी यांच्याकडे सराव करीत असून, या यशाचे श्रेय तिने प्रशिक्षक विनायक कारभारी, वडील सुनील आत्माराम देशमुख व आई वंदना देशमुख यांना दिले आहे.