राजकीय व्यक्तीचा नातेवाईक असल्याची माहिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
रेवदंडा येथील आगारआळीमध्ये घरात घुसून दरोडा टाकून वयोवृध्द महिलेला जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणातील एका संशयीताला रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
घरात एकटीच असलेल्या वयोवृध्द महिलेवर हल्ला करून चोरट्यांनी दागीन्यांसह रोकड असा एकूण 46 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. दरम्यान, वयोवृध्द महिलेला देखील गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात 24 जूलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सुत्रे हालविण्यात आली असून पोलिसांनी रेवदंडा येथील एका संशयीताला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच, ज्याला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे तो एका राजकीय व्यक्तीचा नातेवाईक आणि मित्र ही असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलीस काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.