अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा संशय

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातून 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी तिच्या आजीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत असून, तिचा शोध घेण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलमांडला येथील अल्पवयीन मुलगी दि.10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास भोईघर फाटा येथील दुकानातून जाऊन येते, असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी आसपासच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. अखेर मुलीच्या आजीने पोलिसांकडे धाव घेत तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करून तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version