| उरण । वार्ताहर ।
उरण येथील करंजा बंदरात सोमवारी (दि.26) एक संशयित बोट ताब्यात घेण्यात आली असून उरण पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत. उरण ते रेवस दरम्यान उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना त्यांना विना क्रमांकाची बोट निदर्शनास आली.
या संशयित बोटीचा रेवस बंदरातील सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली. याबाबत उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे.
या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर तपास केला असता बोटीत डिझेल असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास तपास सुरू असल्याची माहिती उरणचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली.