| रायगड | वार्ताहर |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लगत एक संशयित कार आढळून आली आहे. या कारमध्ये रक्तचाचे डाग आणि दोन गोळ्याचे शेल सापडले आहेत. मात्र या कारमध्ये कोणीही सापडले नसून, कारमध्ये असलेल्या कागद पत्रानुसार ही कार नवी मुंबईमधल्या नेरुळ येथील असल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
खोपोली हद्दीतील मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या जवळ फूड मॉलला जाणाऱ्या बाह्य रोडवर एक संशयित कार आढळून आली आहे. या कारमध्ये रक्ताचे डाग व दोन गोळ्याचे शेल सापडले आहेत. मात्र, या कारमध्ये कोणीही सापडले नसून, कारमध्ये असलेल्या कागद पत्रानुसार ही कार नवी मुंबईमधल्या नेरुळ येथील असल्याचे समोर आले आहे. या कारमध्ये सुमित जैन आणि अमीर खानजादा असे दोन तरुण, असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही व्यवसायाने इस्टेट एजंट आहेत. मात्र, तरुण गायब आहेत. कारमधील व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्या दोघांचे फोन देखील बंद आहेत. कारमध्ये या दोन्ही तरुणांच्या चपला आणि इतर साहित्य देखील मिळून आले आहे. या कारमध्ये काही साहित्यासोबत रक्ताचे डाग, गोळ्यांचे शेल आढळून आले आहेत. तसेच फायरिंगमुळे कारच्या पाठिमागच्या काचेला तडा गेला आहे. डॉग स्कॉड व फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने या कारमधून बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे.