| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात गेली 25 वर्षे मुंबई येथील रोटरी क्लब देवनार कडून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच माध्यमातून रोटरी कप कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेत कळंब जवळील सुतारपाडा येथील कबड्डी संघ अंतिम विजेता ठरला.
कर्जत तालुक्यात असलेल्या ग्रामीण रोटरी मंडळ यांची कबड्डी स्पर्धा देवनार रोटरी क्लब कडून दरवर्षी आयोजित करण्यात येते. माणिवली येथील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामीण रोटरी मंडळ यांच्या कबड्डीत स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा शुभारंभ देवनार रोटरीचे अध्यक्ष अलका मुरली यांचे हस्ते झाला. त्यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी कन्नन, भावी अध्यक्ष नलिनी कन्नन, आणि अजित पप्पू, सुरेंद्रनाथ यांच्यासह कर्जत रोटरी ग्रामीण मंडळ समन्वयक अर्जुन तरे तसेच हुतात्मा हिराजी पाटील यांचे वारस विठ्ठल पाटील, माणिवली हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष प्रवीण डायरे, उपाध्यक्ष जितेंद्र गवळी, सचिव लहू डायरे यांच्यासह रोटरी शेतकरी ग्रामीण मंडळाचे दत्तात्रय पाटील, रोटरीचे पदाधिकारी अरुण मसणे, प्रकाश सोनवले, सीताराम बदे, मारुती बागडे गुरुजी, भरत खडेकर, देशमुख आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ग्रामीण रोटरी मंडळाचे शेलू, हूमगाव, कळंब, पोटल पाली, माणिवली, भिवपुरी, बोरगाव, आंबेवाडी, सुतारपाडा हे संघ सहभागी झाले होते. रोटरी कप कबड्डी स्पर्धेत कळंब येथील सुतारपाडा कबड्डी संघाने माणिवली संघाचा पराभव करून विजय मिळविला. या स्पर्धेला विनोद गवळी, शशिकांत पाटील, दिनेश गवळी, मनोहर डायरे, दीपक पाटील, वामन गवळी, मनोहर खाडे, गुरुनाथ डायर, तुषार गवळी, सविता गायकर, भरती जाधव, आदी उपस्थित होते.







