पनवेलमध्ये स्वच्छ भारत अभियान – आयुक्त

विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा
| पनवेल | प्रतिनिधी |

स्वच्छ भारत अभियान 2 राबविण्याच्या दृष्टीने गुरुवारी( 21 जुलै) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहरातील साफसाफई तसेच मेकॅनिकल क्लीननेस, स्वच्छतेविषयीच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच अहिल्याबाई होळकर भवन आणि माता-बाल संगोपन केंद्र,रमाई आंबेडकर सांस्कृतिक भवन यांना शासकीय मदत मिळविण्यासाठीचे प्रस्ताव तयार करणे, रोज बाजारांच्या निविदाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला. यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके , उपायूक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखापरिक्षक विनकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे,यांच्या सह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधणे, महानगरपालिका क्षेत्रात प्लॅस्टिक बंदी मोहिम प्रभावी अमंलबजावणी , अमृत महोत्सवानिमित्ताने 75 दिवस सुरू करण्यात आलेल्या प्रिकॉशन डोसचे लसीकरण, पंतप्रधान आवास योजना ,रोज बाजार निविदा, सरस्वती विद्यालय निष्कांसित करणे, सिडको कडील भूखंड हस्तांतरीत करणे, मालमत्ता करांची बिले पाठविणे, वाहन खरेदी करणे अशा विविध विषयांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला. तसेच त्या त्या विभागास कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या.

Exit mobile version