| म्हसळा | प्रतिनिधी |
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पाभरे या ज्ञानसंकुलात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब व युवकांचे प्रेरणास्थान श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिलजी बसवत व प्रमुख वक्ते मनोहर तांबे, स्कूल कमिटी सदस्य संतोष सुतार, संजय पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी व शिक्षक मनोगतातून राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्वातून घडलेल्या संस्कारांचे महत्त्व, श्री स्वामी विवेकानंद यांचे जीवन व कार्य विशद करण्यात आले. प्रमुख व्याख्याते मनोहर तांबे यांनी श्री स्वामी विवेकानंद जीवन वृत्तांत व कार्य, राजमाता जिजाऊ यांचे जीवन कार्य व संविधानाचे महत्त्व सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक बक्कर यांनी युवा दिनाचे महत्त्व सांगितले. पाभरे गावातून विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून लेझीम पथकाच्या व ढोल ताशाच्या गजराच्या तालावर नृत्यातून रॅली व घोषणा देऊन युवा दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.







