| रसायनी | वार्ताहर |
चांभार्ली ग्रामपंचायतीमध्ये गुरूवारी (दि. 20) स्वप्निल जगन जांभळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. याअगोदरील उपसरपंच समीर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे उपसरपंचपदासाठी माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय गणू जांभळे व संतोष तुळशीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल जांभळे यांनी आपल्या नावाचा एकमात्र अर्ज दाखल केला. यानंतर दुपारी 2 वाजता अर्ज छाननी होऊन विरोधात कोणाचाही अर्ज न आल्याने अध्यासी अधिकारी तथा सरपंच प्रतिप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वप्निल जांभळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने माजी उपसरपंच समीर पाटील यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी नवनिर्वाचित उपसरपंचपदी विराजमान झालेले स्वप्निल जांभळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर चाहत्यांनी जल्लोष करुन ढोल-ताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच दिव्या दत्तात्रेय जांभळे, माजी सरपंच सचिन मते, माजी सरपंच बाली कातकरी, माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, संतोष जंगम, ग्रामपंचायत सदस्य मोहन मुंढे, सचिन कुरंगळे, कैलास म्हात्रे, संतोष पाटील, प्रविण जांभळे, अमृता कुरंगळे, मानसी मुंढे, दर्शना सवार, बेबी गोंधळी, प्रियंका पाटील, धनश्री जांभळे, मिलिंद मुंढे, अनिल जांभळे, सुधीर मुंढे, राजेश मुंढे व संपूर्ण रसायनी परिसर उपस्थित होते.