खरवली उपसरपंच स्वप्नील सकपाळ यांची शेकापमधून हकालपट्टी

तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांची घोषणा
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्नील सकपाळ यांची पक्ष विरोधी कारवायामुळे आमदार जयंत पाटील यांच्या आदेशाने,माजी आमदार पंडित पाटील यांच्या सूचनेनुसार व शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या पूर्वपरवानगीने शेकापमधून हकालपट्टी केल्याची घोषणा तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देत याला शेकापचे मोर्बा येथील जेष्ठ नेते आरडीसी बँकेचे कार्यकारी संचालक अस्लम राऊत यांनी दुजोरा दिला. शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी आपल्या माणगाव येथील निवासस्थानी मंगळवारी 28 डिसेंबर सकाळी 11:30 वाजता याबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती.सदर पत्रकार परिषदेला जेष्ठ नेते अस्लम राऊत उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले कि,खरवली ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यावर आम्ही उपसरपंच पद हे पक्षाच्या काही सदस्यांना अकरा महिने ठरवून दिले होते.स्वप्नील सकपाळ यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी राजीनामा दिला नाही.पक्ष विरोधी कारवाया ते करीत आहेत.पक्षाची ध्येयधोरणे जो मानत नाही त्याला पक्ष श्रेष्ठी जुमानत नाही.म्हणूनच पक्ष विरोधी कारवाया व कुरघोडी करणारे स्वप्नील सकपाळ यांची पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार शेकापमधून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version