| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील सारडे येथील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील स्वप्नोज शशिकांत म्हात्रे हा भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून दाखल झाला आहे. यासाठी त्याने नाशिक येथे गरुड झेप अकॅडमीत तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. तेथे त्याने फिटनेस आणि भारतीय सेनेत दाखल होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने अग्निवीर म्हणून परीक्षा दिली. नुकतेच त्याने आठ महिन्यांचे प्रशिक्षण हैदराबाद येथे घेतले. तेथे तो 1840 प्रशिक्षणार्थींत फायरिंगमध्ये पहिला आला आहे. त्यामुळे त्याची नुकतीच भारतीय सेनेत हिमाचल प्रदेशमध्ये निवड झाली आहे. भारती सेनेत दाखल होणारा स्वप्नोज हा सारडे गावातील पहिलाच तरुण आहे. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन स्वप्नोजचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
सारडेचा स्वप्नोज म्हात्रे भारतीय सेनेत दाखल
