। मुंबई । वृत्तसंस्था ।
संध्यापर्वातली वैष्णवी असा ज्यांच्या उल्लेख कवी ग्रेस करतात त्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. कलासृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगशेकर यांचे निधन ही सर्वात दुखद घटना आहे. या संगीतक्षेत्रातील मोठी हानी असून एक पोकळीच निर्माण झाली आहे. स्वरसम्राज्ञी एकच होती आणि एकच राहणार. मी माझ्या मूळ गावी असताना लहानपणी त्यांचे गाणे ऐकत असे आणि पुढे जाऊन त्यांचासोबत गाणे गाण्याची संधीही मिळेल हे मला वाटलेच नव्हते. हे मी माझे भाग्य समजतो. – उदित नारायण, ज्येष्ठ पार्श्वगायक