स्वराज्य ध्वजाचे रत्नागिरीत स्वागत


। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे रत्नागिरीत आगमन झाले. रत्नदुर्ग किल्ल्यावर या ध्वजाचे स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पूजन केले. यावेळी विविध घोषणांनी रत्नदुर्ग परिसर दुमदुमला होता.
ही ध्वज यात्रा कर्जतहून सुरू झाली असून, देशातील सहा राज्यांमधून 12,000 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये जाणार असून, या दरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक स्थळे, स्मारके अशा ऊर्जा केंद्रे असलेल्या 74 ठिकाणी स्वराज्य ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन केले जाणार आहे. दसर्‍याच्या दिवशी या यात्रेची सांगता होणार आहे.


रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर या ध्वजाचे आगमन झाल्यानंतर ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मयेकर, कुमार शेट्ये, बशीर मुर्तझा, राजन सुर्वे, नीलेश भोसले, बबलू कोतवडेकर, सिद्धेश शिवलकर, जुबेर काझी, सूरज शेट्ये, नारायण खोराटे, साईजित शिवलकर, अभिजित गुरव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version