रामदास मारुती मंदिरात ‘स्वरमाधुरी’ कार्यक्रम


| पनवेल | वार्ताहर |

श्री रामदास (मारुती) मंदिर, पनवेल येथे 107 व्या दासनवमी उत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने ‘स्वरमाधुरी’ या भावभक्ती व नाट्यसंगीतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ गायक पं. मिलिन्द गोखले, युवा शास्त्रीय गायिका चैत्राली देसाई आणि अविनाश देव यांनी या कार्यक्रमात गायनसेवा केली.

‘पंचतुंडनर’ या प्रसिद्ध नांदीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यानंतर मिलिन्द गोखले यांनी परमेशाची लीला, घेई छंद, माझे माहेर पंढरी, दत्ताची पालखी अशी काही नाट्यपदे व अभंग सादर केले. चैत्राली देसाई हिने राम का गुनगान, मी पुन्हा, जय शंकरा, निर्गुणाचा संग अशी काही नाट्यपदे व भावभक्तिपर गीते सादर केली. ज्येष्ठ आणि युवा गायकांच्या सुरेख समन्वयाने नटलेल्या या कार्यक्रमाने रसिक पनवेलकरांची प्रशंसा प्राप्त केली. अथर्व देव यांनी संवादिनी व आदित्य उपाध्ये यांनी तबलासाथ केली. संतोष तारे यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Exit mobile version