| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील उद्योजक हर्षल पितळे यांच्या मातोश्री स्वाती शुक्राचार्य पितळे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा, पती शुक्राचार्य व नातवंडे असा परिवार आहे. स्व. स्वाती पितळे या शिक्षिका होत्या. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले. आपल्या मुलांवरही सुसंस्कार करुन वाढविले. दोन्ही मुलींचे, मुलगा हर्षल याचेही लग्न झाले आहे. स्व. स्वाती पितळे यांच्यावर पेण येथील विश्वेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते.