चौल श्री रामेश्वर पुष्करणीत जलतरण स्पर्धा

युवा जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही रामेश्वर मित्र मंडळाच्या वतीने चौल येथील श्री रामेश्वर पुष्करणीत भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता झालेल्या या स्पर्धेला जलतरणपटू, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या जलतरण कौशल्याचे दर्शन घडविले.

स्पर्धेतील गट क्रमांक 1 मुले ओंडे बांधून या प्रकारात श्रीयांश अमोल म्हात्रे यांनी प्रथम, वंश रोहित कड यांनी द्वितीय, तर ओजस नितीन राऊत यांनी तृतीय क्रमांक मिळविला. गट क्रमांक 2 मुले डबल फेरीमध्ये दिवांशू कुथे प्रथम, हर्ष योगेश ठाकूर द्वितीय, तर श्रावण विलास इंद्रे तृतीय ठरले. गट क्रमांक 3 मुले सिंगल फेरीमध्ये रियांश मनोज ठाकूर प्रथम, सोहम सुनील घरत द्वितीय व अद्वैत विजय वाघमारे तृतीय; तर गट क्रमांक 4 मुले डबल फेरीमध्ये सार्थक मारुती इंद्रे प्रथम, मयूष मनोज ठाकूर द्वितीय व अंश भोईर तृतीय ठरले. गट क्रमांक 5 मुली ओंडे बांधून या प्रकारात आदिश्री हेमंत जाधव प्रथम, ओवी प्रशांत किवळेकर द्वितीय व श्रीषा रोहित पाटील तृतीय; तर गट क्रमांक 6 मुले डबल फेरीमध्ये क्रिश विजय कुथे प्रथम, वेद मंगेश कुथे द्वितीय व मनन जीवन घसे तृतीय क्रमांकावर राहिले. गट क्रमांक 7 मुले सिंगल फेरीमध्ये आयुष शर्मा प्रथम, अर्णव बळीराम पाटील द्वितीय व यश शर्मा तृतीय; तर गट क्रमांक 8 मुले ओंडे बांधून आराध्य आशिष ठाकूर प्रथम, रुद्र विलास जाधव द्वितीय व सानिध्य सुचित वर्तक तृतीय ठरले.

गट क्रमांक 9 मुली सिंगल फेरीमध्ये तीर्था प्रमोद वाजंगी प्रथम, प्रेषिता पाटील द्वितीय व पलक पाटील तृतीय; तर गट क्रमांक 10 मुले सिंगल फेरीमध्ये अर्णव प्रज्वल सकपाळ प्रथम, रुद्र दि. टिवळेकर द्वितीय व जय जितेंद्र म्हात्रे तृतीय ठरले. गट क्रमांक 11 मुली ओंडे बांधून श्रीशा संदेश वर्तक प्रथम, ओवी दिलीप धुमाळ द्वितीय व कृतिक आशिष राऊत तृतीय; तर गट क्रमांक 12 श्री रामेश्वर गटमध्ये विनायक यशवंत नाईक प्रथम, जितेंद्र रामचंद्र जाधव द्वितीय व ओमकार प्रशांत जाधव तृतीय क्रमांकावर राहिले. गट क्रमांक 13 मुले सिंगल फेरीमध्ये हर्षवर्धन म्हात्रे प्रथम, संचित स्वप्नील कवळे द्वितीय व निश नागेश पेरेकर तृतीय; तर गट क्रमांक 14 मुली सिंगल फेरीमध्ये प्रेक्षिका पाटील प्रथम, सई पिलणकर द्वितीय व आरोही राऊत तृतीय ठरल्या. स्पर्धेतील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गट क्रमांक 15 अंतिम फेरी (तीन फेऱ्या)मध्ये दिवांशू कुथे यांनी प्रथम, रोहित कुथे यांनी द्वितीय, प्रेम पाटील यांनी तृतीय, तर सार्थक इंद्रे यांनी चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या आयोजनासाठी भाग्यश्री ज्वेलर्स, नीलेश खोत, जितेंद्र जाधव आणि सिद्धांत वार्डे यांच्याकडे स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.

Exit mobile version