पीएनपी सायरस पुनावाला स्कूल नागावमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण शिबीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्यावतीने तालुक्यातील नागाव येथे पीएनपी सायरस पुनावाला स्कूल नागावमध्ये अद्ययावत जलतरण तलाव बांधण्यात आले आहे. या तलावात अलिबागकरांसाठी 1 ते 31 मे दरम्यान पोहण्याच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबाग तालुक्यातील तरुणांना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सक्षम बनविण्याच्या हेतूने शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी नागाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निश्‍चय केला आहे. त्या दृष्टीने नागाव येथील पीएनपी सायरस पुनावाला स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. फुटबॉल, बास्केट बॉल, लॉन टेनिस, जलतरण तलाव अशा विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याच क्रीडा संकूलामध्ये मिनी ऑलंपिक दर्जाचे नव्याने जलतरण तलाव उभारण्यात आले आहे. अद्ययावत अशा या जलतरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. प्रोफेशल कोच द्वारे येथे प्रशिक्षण देण्यात येणार असून यात चारही प्रकारचे स्ट्रोकचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सकाळी 8 ते 9 या दरम्यान पुरुषांसाठी तर सकाळी 9 ते 10 वाजता महिलांसाठी तर सकाळी 10 ते 11 या वेळेत 7 ते 15 या वयोगटातील लहान मुलांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच दुपारी 4 ते 6 या वेळेत फ्री स्विमींग पूल टाईम असणार आहे. अधिक माहितीसाठी मनिषा रेळकर 7745011000, दिनेश मानकर 9272594803 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version