टी-20 विश्वचषकाचं बिगुल वाजलं

क्रिकेटच्या इतिहासात अमेरिकेला प्रथमच यजमानपद

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

2024 टी-20 विश्वचषक 4 ते 30 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या 10 शहरांमध्ये 27 दिवस 20 संघांमध्ये 55 सामने होणार आहेत. 147 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच अमेरिका आयसीसीच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. टी-20 विश्वचषकाची ही नववी स्पर्धा असणार आहे.

या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 15 संघ पात्र ठरले आहेत. आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचाही त्यात समावेश आहे. त्याचबरोबर यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला थेट प्रवेश मिळाला आहे. या व्यतिरिक्त भारत, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. आयसीसीच्या संघाने युनायटेड स्टेट्समधील काही शॉर्टलिस्ट केलेल्या ठिकाणांची पाहणी केली, जे प्रथमच मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करतील. यामध्ये फ्लोरिडा येथील लॉडरहिल, मॉरिसविले, डॅलस आणि न्यू यॉर्क यांना स्पर्धेचे सामने आणि सरावासाठी निवडण्यात आले आहे.

2021 आणि 2022 टी-20 वर्ल्ड कप मध्ये पहिल्या फेरीनंतर सुपर 12 टप्प्यांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु पुढील स्पर्धेत संघांची 2 ऐवजी 4 गटात विभागणी केली जाईल आणि तेथून पात्र ठरण्यासाठी प्रत्येक गटातील टॉप-2 संघांना सुपर-8 मध्ये स्थान दिले जाईल. सुपर-8 मध्ये पुन्हा दोन गट तयार केले जातील ज्यामध्ये 4-4 संघ ठेवण्यात येतील आणि दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघामध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

Exit mobile version