| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. कालच्या विजयाने अलिबागचे नाव महाराष्ट्रात कोरले गेले आहे. आजचा दिवस हा एक आगळावेगळा आहे. पडद्यामागे राहून काम करणाऱ्या, मोठेपणा नसलेल्या सुप्रियाताई पाटील यांनी अनेक पदे भूषविली आहेत. जमिनीवर पाय ठेवून मायेची ऊब देऊन त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले आहे. सुप्रियाताई यांची भाची अक्षया नाईक यांनी कमी वयात अलिबागच्या नगराध्यक्षा बनण्याचा बहुमान संपूर्ण महाराष्ट्रात मिळविला आहे. सुप्रियाताई यांचा वाढदिवस आणि नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सन्मान सोहळा हा एक सुवर्ण संगम आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या चित्रलेखा पाटील आहेत. चित्रलेखा पाटील या गोरगरीबांच्या घरी जाऊन भाकरी खाणाऱ्या नेत्या आहेत. जनतेसाठी निःस्वार्थी सेवा करणाऱ्या आहेत. अनेकांना मदतीचा हात देऊन उभारी देण्याचे काम चित्रलेखा पाटील यांनी सक्षमपणे केले आहे. समाजसेवेचा ध्यास कायम असणाऱ्या सुप्रियाताई पाटील आणि चित्रलेखाताई पाटील यांचे कार्य मोलाचे आहे, असे गौरवोद्गार शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी काढले.







