राष्ट्रध्वजाचा मास्क विकणार्‍यांवर कारवाई करा – हिंदू जनजागृती समिती

ई-कॉमर्स संकेतस्थळे, दुकानांमध्ये बेकायदेशीर विक्री
| उरण | वार्ताहर |
भारतीय राष्ट्रध्वज हा कोट्यवधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशीलविषयी ङ्गरेड-बबलफसारख्या ङ्गई-कॉमर्सफ संकेतस्थळांद्वारे, तसेच दुकानांत आणि रस्त्यावर 15 ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या ङ्गमास्कफची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियान उपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

हिंदू जनजागृती समितीद्वारे दरवर्षी प्लास्टिक/कागदी राष्ट्रध्वज वापरू नये, राष्ट्रध्वजाचा अपमान करू नये, यासाठी जनजागृती केली जाते. आता राष्ट्रध्वजाचा मास्क वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. राष्ट्रध्वज हे सजावट करण्याचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, तो अस्वच्छ होणे, तसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, तो कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. तरी शासनाने या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाचे मास्क वापरू नये, राष्ट्रध्वजाचा अपमान करू नये, असे आवाहन अधिवक्ता निलेश सांगोलकर, समन्वयक, सुराज्य अभियान तसेच डॉ. उदय धुरी प्रवक्ता हिंदू जनजागृती समिती मुंबई विभाग यांनी केले आहे.

Exit mobile version