सरकारी जमिनी घशात घालणार्या धनदांडग्यांना विरोध करणार्या महिला आणि ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करण्याची घटना आज विहूर गावात घडल्याने सर्व स्तरातून याचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणात भूमाफिया म्हणून कुप्रसिद्ध असणार्या अलिबाग मुरुडमधील मोठ्या राजकीय नेत्याचा समावेश असल्याचे बोलले जाते. तसेच मुरुडच्या नवाबाचा ही समावेश असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. मात्र राजकिय दबाव, धनदांडग्यांची हुकूमशाही न जुमानता लढा उभारणारे विहूरचे शेकापचे माजी सरपंच रमेश दिवेकर, विद्यमान सरपंच नीलिशा नरेश दिवेकर यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. महिलांवर हात उगारणार्या त्या पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
प्रशासनाने लाज सोडली! महिलांवर हात उगारणार्यांवर कारवाई करा अन्यथा…

- Categories: sliderhome, अलिबाग, महाड, राजकीय, राज्यातून, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmurudonline marathi newsraigad alibagraigad crimeraigad police
Related Content
नागाव-खारगल्ली येथे भीषण अपघात; बोरपाडा येथील प्रकाश भगत यांचा दुर्दैवी मृत्यू
by
Sanika Mhatre
November 19, 2026
बालदींना शिक्षा, आमदारकीला धक्का
by
Sanika Mhatre
November 19, 2026
दिवेआगरच्या सरपंचांवर गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
November 19, 2026
सरकार नमलं! 25 नोव्हेंबरची मोजणी पुढे ढकलली
by
Sanika Mhatre
November 19, 2026
खोपोलीतील पनीकर हत्या प्रकरण; संशयित आरोपीला गोव्यातून अटक
by
Sanika Mhatre
November 19, 2026
250 कुटुंब घराच्या प्रतीक्षेत!
by
Sanika Mhatre
November 19, 2026