किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

| पोलादपूर | प्रतिनिधी |
किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकर्‍यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इत्यादी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं; जे शेतकरी पी.एम किसान योजना लाभार्थी आहेत. परंतु अद्याप कोणत्याही बॅकेचे पिक कर्ज नसेल, अशा शेतकर्‍यांनी केसीसी कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅक ऑफ इंडिया शाखा पोलादपूर व्यवस्थापक गजेंद्र घाडगे यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी पोलादपूर यांचे वतीने देवपूर येथे क्रॉपसॅप अंतर्गत भात शेतीशाळा पाचव्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बॅक ऑफ इंडिया शाखा पोलादपूर व्यवस्थापक गजेंद्र घाडगे, कृषी सहाय्यक मनोज जाधव, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील, कृषी सहाय्यक मनोज जाधव, गुरुमाऊली शेतकरी गट अध्यक्ष जगदीश महाडिक, सचिव महादेव शिंदे, माजी सरपंच गणपत महाडिक, प्रविण महाडिक, ज्ञानेश्‍वर पवार, विजय मोरे, आदी शेतकरी उपस्थित होते. गजेंद्र घाडगे,कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी आभार मानले.

Exit mobile version