उष्माघातापासून वाचण्यासाठी खबरदारी घ्या; मुख्याधिकारी-पंकज भुसे यांचे आवाहन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

वातावरणीय बदलामूळे उन्हाळी हगांमात वाढत्या तापमानामूळे उष्मालाट येत आहेत. या उष्णतेच्या लाटेपासून होणार्‍या गंभीर परिणामापासून वाचण्यासाठी जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुरुड नगरपरिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी केले आहे.

उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या, घरुन आणलेले ताक, लिंबु पाणी, नाराळ पाणी, फळांचे रस असे द्रव्य पदार्थ घ्या, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा, दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा, प्रवासावेळी पाण्याची बाटली जवळ बाळगा, असे आवाहन मुरुडच्या नागरिकांना मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या मार्फत प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी केले आहे.

Exit mobile version