तळा पोलीस स्टेशनकडे दुर्लक्ष

| तळा । वार्ताहर ।

तालूका निर्मीतीला 25 वर्षाचा काळ लोटला. शहराचे ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत रूपांतर होत असताना शहरीकरणाचे बरोबरीने अन्य विकास होत आहे. लोकसंख्याही वाढली आहे, दुसर्‍या बाजूने गुन्ह्यांचा आलेखही वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात कायदा वसुव्यवस्थाठेवणार्‍या पोलिसांचा फौजफाटा वाढत नसल्याने शहरातील किरकोळ व अन्य गुन्हेगारीत वाढ आहे. यामध्ये राष्ट्रद्रोहापासून घरफोड्या, सातत्याने होणारी ट्रॅफीक जाम असे सर्व गुन्हे होत आहेत.

तालुक्यात सन 2009 पर्यंत औट पोस्ट होते. तालुका तेथे पोलीस स्टेशन या गृह विभागाच्या धोरणानुसार तालुक्यासाठी पोलीस स्टेशनची निर्मीती करण्यात आली. त्यावेळेपासून म्हणजे 25 वर्षात परीपूर्ण स्टाफ मिळाला नाही. पोलीस स्टेशनला गृह विभागाच्या अकृतीबंधानुसार मंजुर संख्या निरीक्षक-1, स.पो.नि-1, पो.स.ई-1, सहा.फौजदार-1, पोलीस हवालदार-12, पोलीस नाईक- 18, पोलीस कॉन्स्टेबल-26, एकुण 3 अधिकारी, 60 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.

तळा तालुक्यातील 69 गावाची लोकसंख्या 45 हजार 941 आहे, कळसांबळे, वाली, ताम्हाणे-मजगांव पर्यंतच्या तालुका सिमा रेषेपर्यंतचा परिसर कार्यक्षेत्र असून फक्त 24 कर्मचारी असून 69 गावातील वाड्या व त्या सुमारे 45 हजार नागरीकांची जबाबदारी आहे. त्यामध्ये महीलांचे प्रमाण अधिक आहे. पोलीस स्टेशन मधीलकर्मचारीअधिकारी फिरती, रजा, कोर्ट पैरवी, तपास, गेम – प्रॅक्टीस, रिफ्रेशमेंट कोर्स, सीक लीव्ह यासाठी कमी जास्त प्रमाणांत बाहेर आसल्याने अंदाजे 2 हजार नागरीकांमागे केवळ 1 पोलीस तैनात आसल्याची केवीलवाणी परीस्थिती तळा पोलीस स्टेशनची आहे. आज केवळ 24 पदे आहेत, त्यामध्ये 7 कर्मचारी अन्य कामात असतात ते प्रमाणे सेशन कोर्ट 2, मुख्यालय आणि अन्य पोलीस स्टेशन 4, आमदार अंगरक्षक 1. तळा पोलीस स्टेशनकडे रायगड पोलिस अधिक्षकांचे त्याच प्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

गुन्हयांचा व कार्यक्षेत्राचा अभ्यास करता अधिक कर्मचारी असणे गरजेचे वाटते. वाहतुकीचे गुन्हे जास्त होत असतात शहराचे बाजूने दिघी पुणे राष्ट्रीय महामार्ग आत आहे, तो मार्ग नसल्यामुळे दिघी- श्रीवर्धन दिवेआगर मुरूड बाजूकडेजाणार्‍या वाहतुकीला तळा शहराच्या नाका या मुख्य चौकातून जावे लागते. हल्ली विकएंडला पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी असते. शहरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच असून वाहतूक शाखेचा अधिकारी कर्मचारी नाही. असल्यास लगतच्या तालुक्यातील वाहतूक कोंडीसाठी कर्तव्यावर जावे लागते. त्यामुळे महसूलावर परिणाम होत आहे. या सर्व कारणाने कमी संख्येने असणार्‍या आधिकार्‍यांवर सतत प्रचंड ताण असतो. तालुक्याच्या रौप्य महोत्सवी वर्षांपर्यंत शासकीय जागेत स्वतंत्र पोलीस ठाणे नाही, हि खेदाची बाब आहे. पोलीस स्टेशनच्या आधीकार्‍यांना, कर्मचारी वसाहत निवासस्थानेही नाहीत. याबाबत अनेक वेळा तालूका समन्वयक समीती, जनता दरबार व वृत्तपत्राचे माध्यमातून गंभीर समस्यांना लक्ष केले. शहरातच नगरपंचायत हद्दीत जागा उपलब्ध झाली. परंतू नियोजन शून्य काम समोर आले आहे. याबाबत गांभीर्याने घेतले गेले नाही. कार्यरत पोलिस ठाणे गेली जवळपास 10 वर्ष भाड्याची जागेत असून जागा अपुरी आहे, सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या पोलीस कर्मचार्‍यांच्या श्‍वास कोंडतो आहे.

Exit mobile version