तलाठ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी: जयपाल पाटील

। कोर्लई । वार्ताहर ।

शासनाच्या महसूल पंधरवडा निमित्ताने मुरुड तहसील कार्यालयातर्फे तहसीलदार रोहन शिंदे यांच्या आदेशाने पंचायत समिती सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिरात ग्रामसेवक व तलाठी यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तज्ञ डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.

यावेळी नायब तहसीलदार राजश्री साळवी, नागरी संरक्षणदल मुंबईचे अजित कारभारी, आपत्ती सुरक्षा मित्र उदय सबनीस, नेहा पाके, पोलीस निरीक्षक उदय झावरे, वनपाल संतोष रेवणे, नांदगाव सरपंच सेजल घुमकर, मंडळ अधिकारी खुशाल राठोड उपस्थित होते.

महिलांनी सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीसांच्या 112 क्रमांक आणि त्याचा वापर कसा करावा.याबाबत पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी माहिती दिली. मुरुड ग्रामीण रुग्णालय 108 रुग्णवाहिका उपविभाग परिचारिका यांनी मार्गदर्शन केले तर पायलट यांनी रुग्णवाहिका वेळेवर आणली. रस्त्यावर गावात विंचू दंश, सर्पदंश, अपघात झाल्यावर 108 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा? याबाबत माहिती डॉ.काझी यांनी दिली. डोंगरावरुन रुग्णवाहिकेपर्यंत रुग्ण, ज्येष्ठांना कसे न्यायचे, हाताची घडी व चादरीमधून वाहतूक याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पाणी बचत, गॅस बचत, झाडे लावा, याबाबतही माहिती देण्यात आली. शेवटी आग लागली असता कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Exit mobile version