क्रिकेट स्पर्धेत तळोजा टायगर्स विजयी

। पनवेल । प्रतिनिधी ।
टीडीडब्लूए आयोजित अंतिम क्रिकेट सामन्यात तळोजा टायगर्स विजयी झाले आहेत. त्यांनी पनवेल वारीयर्सचा पराभव केला. तर या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज डॉ.सचिन मोकल, बेस्ट बॅट्समन डॉ.अनिकेत भोईर, बेस्ट बॉलर डॉ.सुरेश ठोंबरे, डॉ.श्रीनिवास माने, बेस्ट क्षेत्ररक्षक डॉ. सचिन गोरे, बेस्ट विकेटकिपर डॉ.प्रवीण कांबळे आदींची निवड करण्यात आली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सर्व डॉक्टरांनी तणावातून बाहेर येण्यासाठी तळोजा डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संतोष जगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने खेळवले.


या सर्व स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक डॉ.अरुणकुमार भगत, डॉ.मंगेश डाके, डॉ.विजय डोंगरे, डॉ.श्रीनिवास माने, डॉ.विनोद चव्हाण, डॉ.संजय कुरंगळे, डॉ.उत्तमकुमार शिंदे, डॉ निलेश इंगळे, डॉ.मनीष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत टी.डी.डब्लू.ए.11, करंजाडे लायन्स, तळोजा टायगर, खारघर वारीयर्स, पनवेल वारीयर्स, खांदा कॉलोनी सुपरकिंगस, कळंबोली वारीयर्स, कामोठे दबंग, उलवे युनायटेड, पनवेल स्ट्रायकर, खारघर फोनिक्स आणि कर्नाळा वारीयर्स अश्या 12 डॉक्टर्स संघांनी भाग घेतला होता. हे सर्व सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.


सदर क्रिकेट सामने यशस्वी होण्यासाठी तळोजा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संतोष जगे, उपाध्यक्ष डॉ.सतीश भोईर, सेक्रेटरी हेमंत सपकाळ, डॉ. राहुल भोईर, डॉ.तपन पाटील, डॉ.नितीन गोपले, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.वैभव कोपरकर, डॉ.अमर राजे, डॉ.यु.बी.शेलार, डॉ.रवींद्र नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version