तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचा शुभारंभ

19 शाळांमधून 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुकास्तरीय स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुल नेहुली-संगम येथी मैदानावर या स्पर्धा होत असून, त्याचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत 19 शाळांमधून जवळपास 200 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

याप्रसंगी स्पर्धा आयोजक शाळेच्या प्राचार्या सिस्टर बेरील झेवियर, तालुका समन्वयक रमेश भगत, यतिराज पाटील, बी.डी. गायकवाड, बी.आर. गुरव, सुषमा डाकी, अक्षय डाकी, तेजस म्हात्रे, तालुक्यातील क्रीडा शिक्षिक उपस्थित होते. या स्पर्धेत तालुक्यातील 19 शाळांनी सहभाग घेतला असून, सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी मुलींच्या 100 मीटर धावणे स्पर्धेला झेंडा दाखवून सुरूवात केली. या स्पर्धेत 14,17 व 19 वर्ष वयोगटातील मैदानी स्पर्धांतर्गत धावणे सर्व प्रकार, फेकी प्रकार व उडी प्रकार घेण्यात आले.

Exit mobile version