संस्कृतीने पटकावला प्रथम क्रमांक
| माणगाव | वार्ताहर |
छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी मोठ्या गटात छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती ऐत (इयत्ता नववी)हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर माणगाव येथील जावळी हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये संस्कृतीने हे यश संपादन केले आहे. रोहा या ठिकाणी होणार्या छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त या स्पर्धा घेण्यात येत असून अत्यंत उत्साहाने या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत संस्कृतीने दमदार भाषण देत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष काका नवगणे, माजी सरपंच राजू शिर्के, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. संस्कृती ऐत हिने प्राप्त केलेल्या प्रथम क्रमांकाबद्दल माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष संजय पालकर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष कदम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व शिक्षणप्रेमी यांनी संस्कृतीचे व मार्गदर्शक शिक्षक अजित शेडगे यांचे अभिनंदन केले आहे.