तालुका विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सारळ येथील विद्यालयात तालुका विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला.
समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा उद्देश समोर ठेवून पंचायत समिती शिक्षण विभाग, जनता शिक्षण मंडळ माध्यमिक शाळा सारळ, यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सारळच्या सरपंच अमृता नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील, शाळा समिती सदस्य ऋषिकेश नाईक, सुशील पाटील, विजय साळुंखे, माजी सरपंच अमृता पाटील, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपाळे, गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद भोपी, सारळ हायस्कूलचे मुख्याध्यापक, दत्तराज यावलकर, केंद्र प्रमुख देविदास थळे, विज्ञान अध्यापक मंडळ अलिबागचे अध्यक्ष वैशाली पाटील, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनुपमा चवरकर, सर्व केंद्र प्रमुख,साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version