पनवेलमध्ये तानाजी सावंत यांचा निषेध

। पनवेल । वार्ताहर ।

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबादमध्ये हिंदू गर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाष्य करताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य केले. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे सावंत यांचा पनवेल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि.28) श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक पनवेल येथे जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी विनोद साबळे, गणेश कडू, मारुती महाडीक, सचिन भगत, विकास वारदे, यतीन देशमुख, पराग मोहिते, राजू नलावडे, रामेश्‍वर आंग्रे, संतोष जाधव, सदानंद शिर्के, राजेंद्र भगत, प्रविण जाधव, भरत पाटील, स्वप्निल काटकर, कुणाल कुरघोडे, भरत जाधव, ओंकार गावडे, सन्नी टेमघरे, अल्पेश माने, दतात्रेय म्हामुळकर, सचिन जाधव, प्रताप उतेकर, लक्ष्मण थले यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version