तनिष यादवची गरूड भरारी

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव येथील प्रसिद्ध असणार्‍या हॉटेल आनंद भुवनचे मालक व विद्यमान नगरसेवक आनंद यादव यांचे सुपुत्र तनिष यादव याने लंडन येथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय विषयात एमबीए पदवी संपादन केली. तनिषने प्राप्त केलेल्या या उज्वल यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे. आपल्या आजोबा व वडिलांच्या व्यवसायिक क्षेत्रात तन्मय व तनिष या दोघा भावांनी व्यवसाय क्षेत्रात ज्ञान आत्मसात केले. तन्मयने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून तो हॉटेल आनंद भुवनमध्ये विशेष लक्ष घालून आपल्या वडिलांना मदत करून हॉटेलची प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच पद्धतीने तनिष यादव याने लंडन येथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय विषयात एमबीए पदवी संपादन केली असून त्याने व्यवसाय क्षेत्रात गरुड भरारी घेण्याचा मानस बोलून दाखविला आहे.

Exit mobile version