मिल ठाकूरवाडी येथे नळा पुरवठा योजना

| खोपोली | वार्ताहर |
खोपोली नगरपालिका हद्दीतील डोंगराळ भागात अनेक वर्षांपासून पाणी टंचाई असणार्‍या मिल ठाकूरवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आल्याने त्याचा लोकार्पण सोहळा आ.महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी नगरसेवक राजू डुमणे,माजी नगरसेविका लीलाताई डुमणे यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला होता.यावेळी मुख्याधिकारी अनुप दुरे, दत्तात्रेय मसुरकर,कुलदीपक शेंडे, राजू गायकवाड, पंकज पाटील , संदीप पाटील, तात्या रिठे, प्रसाद वाडकर, जितू शहा ,चंदू फावडे,अमोल जाधव, दिनेश थोरवे प्रवक्ते अमोल पाटील ,हरिष काळे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आंनद कोळी सर यांनी केले.

Exit mobile version