| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात दुपारी 3 वाजून 45 मिनिटाच्या सुमारास मुसळधार अवकाळी पावसाने गारपिटांसह दमदार सुरुवात केल्याने अनेकांची तारांबळ उडाली. वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे मतदानासाठी घराबाहेर पडणार्या नागरिकांची चांगलीच फजिती झाली. अनेकांनी दुपारच्या कडाक्याच्या उन्हानंतर मतदान करण्याचा बेत आखला होता, परंतु, अवकाळीने त्यांची निराशा केली. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाचा जोर इतका भयानक होता की, अनेकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते.