तटकरे महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

। तळा । प्रतिनिधी ।

द. ग. तटकरे महाविद्यालयात 20 आणि 21 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कबड्डी, क्रिकेट, रनिंग 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, गोळा फेक, थाळी फेक, कॅरम, बुद्धिबळ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शुक्रवारी (दि.20) झालेल्या मुले आणि मुलींच्या कबड्डी स्पर्धेत बी.कॉम वर्गाचा संघ विजयी झाला आहे. तर, मुले आणि मुलींच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये बी.ए. वर्गाचा संघ विजयी झाला आहे. तसेच, शनिवारी (दि.21) वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. सुयोग्य नियोजनामुळे यशस्वीरीत्या या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.

यावेळी संस्थेचे सदस्य महादेव बैकर, प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. भरत चाळके, प्रा. विजय चव्हाण, इतर प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version