महामार्ग वेळेत पूर्ण करा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

खा. सुनील तटकरेंची अधिकाऱ्यांना तंबी

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचावे, जनतेला दिलासा मिळावा आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला त्रास कमी व्हावा, वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी खा. सुनील तटकरे यांनी सुतारवाडी येथील कार्यालयात त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. दरम्यान, अकार्यक्षमता, विलंब व वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना झापले.

महामार्गावरील कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेताना अधिकाऱ्यांकडून मिळालेली विलंबाची कारणे आणि वेळकाढू उत्तरे पाहून खासदार तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कामात हयगय सहन केली जाणार नाही. दिवस-रात्र काम करा. महामार्ग वेळेत पूर्ण झाला पाहिजे.” पुल, रस्ते, उड्डाणपूल, बायपास सर्व प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश दिले. महामार्गावरील काही कामे प्रलंबित असल्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट पूल, सर्व्हिस रोड उड्डाणपुलांचे अपूर्ण काम, बायपास मार्गांवरील धीम्या हालचाली, मार्गावरील खड्डे आणि निकृष्ट पॅचवर्क, या सर्वांवर खासदारांनी थेट लक्ष केंद्रित करून निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हा महामार्ग 2026 मध्ये पूर्ण होईल असे संसदेत आश्वासन दिल्यामुळे जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हा महामार्ग 2026 मध्ये पूर्ण होईल, असे संसदेत आश्वासन दिल्यामुळे जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. परंतु, आता तरी दिलेले आश्वासन पूर्ण होणार का, असा सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.

Exit mobile version