। उरण । प्रतिनिधी ।
उरण-जुईनगर-पनवेल टॅक्सी चालक मालक संघटनेची सर्वसाधारण सभा रविवारी (दि.28) उरणमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस व जेष्ठ सल्लागार भावना घाणेकर तसेच उरण वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार उपस्थित होते. यावेळी संजय पवार यांनी वाहतूकीचे नियम व शिस्त याबद्दल सर्वांना चांगल्या प्रकारे मागदर्शन केले. भावना घाणेकर यांनी सांगीतले की, आपल्या संघटनेसाठी लागेल ती सर्वतोपरी मदत करेन व सर्वांना सहकार्य करेन. या मिटिंगचे आयोजन संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश कांबळे यांनी केले. यावेळी संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी विविध समस्या व यावर उपाय योजनेबद्दल चर्चा करण्यात आली. संघटनेतर्फे भावना घाणेकर व संजय पवार यांचे आभार मानण्यात आले.