| अलिबाग | वार्ताहर |
कामार्ले शाळेच्या शिक्षिका सुजाता बाळकृष्ण पाटील 36 वर्षांच्या सेवेनंतर या नियतवयोमानानुसार सोमवार, दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम कामार्ले शाळेत पार पडला. या कार्यक्रमास परहूरपाडा केंद्राच्या केंद्रप्रमुख अनिषा पाटील यांच्यासह केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामार्ले शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांसह पालकही उपस्थित होते. यावेळी सुजाता पाटील यांना सन्मानपत्र, साडी, श्रीफळ व रोपटे देऊन केंद्रप्रमुख तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडूनही त्यांना भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमास पाटील बाईंचे कुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोकल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक तसेच केंद्रातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.