तंबाखूमुक्त शाळाविषयी शिक्षकांचे प्रशिक्षण

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण ग्रामीण रुग्णालय, शिक्षण विभाग पंचायत समिती उरण व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे पंचायत समिती उरण येथे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.

या प्रशिक्षणाला अतिथी म्हणून उरण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो काळेल, गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत, सलाम मुंबई फाऊंडेशनच्या प्रशिक्षण मार्गदर्शिका सारिका ब्राऊन, दंत शल्यचिकित्सक डॉ. संतोष झापकर व अलिबाग जिल्हा रुग्णालय तंबाखू नियंत्रण सुशील साईकर तसेच अन्यजण उपस्थित होते.

तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण वाढल्याने बऱ्याचदा उपचार घेण्यासाठी रूग्णांना दूर जावे लागते. त्यामुळे आर्थिक अणि मानसिक त्रासाची दगदग होते. यासाठी या कार्यशाळेतून शिक्षकांना व मुलांना आयुष्यभर तंबाखू अणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. तसेच समाजात जनजागृती होईल, असे डॉ. काळेल यांनी सांगितले. डॉ. झापकर, श्रीमती सारिका, सुशील साईकर यांनीही तंबाखूच्या दुष्परिणामांविषयीची माहिती दिली. केंद्रप्रमुख म्हात्रे यांनी आभार मानले.

Exit mobile version