शिक्षकांचे महाआक्रोश आंदोलन

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्यात गेली पंधरा ते वीस वर्षापासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक विनावेतन अध्यापनाचे कार्य करीत आहेत. पण शासन दरबारी या अघोषित शिक्षक वर्गाची कोणाकडूनही दखल घेतली जात नाही. सरकारे अली आणि गेली पण अद्याप या विनाअनुदानित शिक्षकांकडे दुर्लक्षच. यासाठी महाराष्ट्र राज्य अघोषित शिक्षक महासंघ यांच्या नेतृत्वात अघोषित शिक्षक आपल्या न्याय व हक्कासाठी सोमवार (10) पासून आझाद मैदानावर हजारो शिक्षक बेमुदत आंदोलनासाठी ठाण मांडून बसले आहेत.

अघोषित शिक्षकांना आपले कुटुंब चालविण्यासाठी अध्यापन करून दुसरीकडे मोल मजुरी करावी लागते. या शिक्षक वर्गाची आर्थिक परिस्थिती बेताची त्यामुळे स्वतःच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाही. अघोषित शिक्षकातील काही शिक्षक अनुदान मिळण्यापूर्वीच विनावेतन सेवेतून निवृत्त होतील याला जबाबदार कोण? असे असंख्य प्रश्‍न या विनाअनुदानित शिक्षकांना भेडसावत आहेत. या आंदोलना दरम्यान अघोषित शिक्षकांनी आपल्या व्यथा मांडल्या.

Exit mobile version