अध्यापकांकडून जुन्या आठवणींना उजाळा

| कोर्लई | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील डि.एड. महाविद्यालयाच्या सन.1985 अध्यापकांनी नुकताच सलग सातव्यांदा दोन दिवसीय स्नेहमेळावा साजरा करुन आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व 1985च्या ग्रुप मधील दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यांत आली. तसेच, ग्रुपमधील सेवा निवृत्त शिक्षक रमेश म्हात्रे, प्रतिभा पाटील, विजया गुंजाळ यांना भेट वस्तुदेऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर खोकरी येथील प्रसिद्ध असलेल्या घुमटाला व मुरूड मधील डोंगर माथ्यावर असलेले प्रसिद्ध श्रीदत्तमंदिराला भेट दिली. यादरम्यान, मुरूड-जंजिरा नगरपरिषदेत निवडून आलेले नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पाटील, अलका फोंडे, मिनाक्षी महाडिक, प्रियवंदा पाटील, विजया गुंजाळ, माधुरी झेमसे, सुजाता दांडेकर, सुमिता तेलंगे, सुलोचना जामकर, प्रतिभा पाटील, निर्मला शेरमकर, निलवंती पिंगळे, राजेंद्र साखरकर, दत्ताराम म्हात्रे, प्रदिप म्हात्रे, प्रभाकर पाटील, सुनिल राऊत, विश्वजीत म्हात्रे, रमेश म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, पांडुरंग आरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर, सुनिल पाटील यांनी आभार मानले.

Exit mobile version