आशिया कपसाठी संघाची घोषणा

कौरच्या नेतृत्वाखालील 15 खेळाडूंचा समावेश

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

बीसीसीआयने महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाने आतापर्यंत विक्रमी 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. यंदा भारतीय संघ आठव्यांदा कप जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघाची कमान अनुभवी हरमनप्रीत कौरच्या हाती असेल. याशिवाय दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गट ‘अ’ मध्ये आहे. भारताव्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान 19 जुलैला आमनेसामने येणार आहेत. यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचा संघ 21 जुलैला आमनेसामने येतील. तर भारत आणि नेपाळ यांच्यात 23 जुलै रोजी सामना होणार आहे.

भारतीय संघ 
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यिष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन. राखीव खेळाडूः श्‍वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग
Exit mobile version