टीम इंडियाचे मोठ्या स्पर्धांकडे लक्ष्य

| मुंबई । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट संघाने गेल्या वर्षामध्ये बरेच चढ-उतार पाहिले आहेत. 2022 मध्ये, टीम इंडियामध्ये कर्णधारपदापासून निवड समितीपर्यंत बदल करण्यात आले आहेत. गतवर्षी आशिया चषक आणि टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत संघाची कामगिरी खराब राहिली होती. 2023 मध्ये भारतीय क्रिकेट टीम एका वेगळ्या रुपात मैदानात उतरणार आहे.टीम इंडिया नवीन वर्षात दोन मोठ्या आयसीसी स्पर्धांना टार्गेट करणार आहे. तसेच अनेक मोठ्या मालिकांवरही लक्ष असेल.

1. वेग-वेगळे कर्णधार
भारतीय संघ 2023 मध्ये प्रथम टी-20 क्रिकेटमध्ये नवीन कर्णधाराची नियुक्ती करेल. बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत याचे संकेत दिले आहेत. कारण या मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. त्याच वेळी, बीसीसीआय टी-20 विश्‍वचषक 2024 च्या दृष्टीने संघ बांधणीवर जोर देता दिसेल. बीसीसीआय टी-20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवू शकते. मात्र, बीसीसीआयने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र हार्दिक पांड्यालाच कर्णधार बनवले जाईल असे मानले जात आहे. तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व करणार आहे.

2. स्प्लिट कोचिंग
तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वतंत्र कर्णधारासारखे वेगळे प्रशिक्षक नियुक्त केले जावे, अशी चर्चा आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने या गोष्टीचे समर्थन केले. त्याच वेळी, बीसीसीआय 2023 मध्ये प्रशिक्षकांचे विभाजन करू शकते. इंग्लंड संघाने हे केले आणि त्यांच्या खेळात बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआय देखील त्याचा वापर करण्याचाही विचार करू शकते.

3. बॉर्डर गावसकर ट्रॉफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटचा भारत दौरा 2016 मध्ये केला होता. त्या काळात ही मालिका खूपच रोमांचक होती. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली. आणि यावेळी 2023 मध्ये भारताला पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकायची आहे.

4. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आता थोडाच वेळ शिल्लक आहे. त्याचवेळी, भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये ते दुसरे स्थान मिळवले.

5. आशिया कप
आशिया चषक 2023 सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. मात्र, यावेळी पाकिस्तान त्याचे यजमानपद भूषवणार आहे. यावेळी भारतीय संघाला आशिया कप कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. त्याचवेळी, बीसीसीआय आशिया चषकासाठी भारताला पाकिस्तानला पाठवणार नाही, असे विधान केले होते. त्यामुळे पाकिस्तानकडून होस्टिंग हिसकावून घेतले जाऊ शकते.

6. एकदिवसीय विश्‍वचषक
एकदिवसीय विश्‍वचषक 2023 यावेळी भारतातच होणार आहे. भारताने 2022 मध्ये आयसीसी स्पर्धेचे शेवटचे आयोजन केले होते. तर यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.

Exit mobile version