अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद तर चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपद
। मुंबई । वृत्तसंस्था ।
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
कानपूर येथे होणार्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणार्या दुसर्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल. आंध्र प्रदेशचा 28व र्षीय भरत इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता.