वनडे आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक आले समोर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौर्यात उभय संघात 3 वनडे आणि 3 टी-20 मालिका खेळवण्यात येईल. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. 13 जुलै ते 25 जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेसमोर उभी असेल. करोनाचे संकट पाहता सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
भारताचे श्रीलंकेसोबतचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौर्यावर असून श्रीलंका दौर्यासाठी नवीन आणि युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाणार आहे. या दौर्यासाठी शिखर धवनच्या हातात भारतीय संघाची कमान असू शकते. शिवाय, मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिकरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सूर्यकुमारने पदार्पण करत आपल्या गुणांची चुणूक दाखवली होती.
नवीन खेळाडूंना मिळणार पदार्पणाची संधी
या दौर्यासाठी काही नवीन खेळाडूंनाही संधी मिळू शकते. यात चेतन साकारिया, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. आगामी टी-20 वर्ल्डकपला समोर ठेऊन निवडकर्ते या दौर्याकडे आणि खेळाडूंकडे लक्ष ठेवणार आहेत.
वनडे मालिका
13 जुलै – पहिला वनडे सामना
16 जुलै – दुसरा वनडे सामना
18 जुलै – तिसरा वनडे सामना
टी-20 मालिका
21 जुलै – पहिला टी-20 सामना
23 जुलै – दुसरा टी-20 सामना
25 जुलै – तिसरा टी-20 सामना