स्टार ऑलराऊंडर मालिकेतून बाहेर
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त होऊन संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.
सुंदरला मालिकेपूर्वी दुखापत झाली असून यापुढे तो या मालिकेचा नसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर कोलकाता येथे उपस्थित असलेल्या भारतीय संघापासून वेगळा झाला आहे आणि आता तो थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाईल, जिथे त्याच्या दुखापतीची काळजी घेत उपचार केले जातील जाईल. सुंदरने नुकतेच एकदिवसीय मालिकेतूनच संघात पुनरागमन केले होते. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या अधिकार्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुंदरला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे, त्यामुळे तो या मालिकेत खेळण्याची शक्यता नाही. अधिकार्याने सांगितले की, वॉशिंग्टनला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो आज सराव करू शकला नाही. 5 दिवसांत 3 सामने खेळवले जाणार असल्याने तो संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
सुदरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतूनच टीम इंडियात पुनरागमन केले. गतवर्षी इंग्लंड दौर्यावर दुखापत झाल्याने तो कसोटी मालिकेत खेळला नव्हता. यानंतर तो आयपीएल 2021 आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिका दौर्यावर एकदिवसीय मालिकेसाठी सुंदरची निवड करण्यात आली होती, परंतु रवाना होण्यापूर्वी त्याला कोरोना संसर्ग झाला आणि त्यामुळे तो बाहेर झाला. टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाकडे आता फक्त लेग-स्पिनर युजवेंद्र चहल हा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. संघात रवी बिश्नोईचाही समावेश असला तरी हरप्रीत ब्रारही स्टँडबाय म्हणून संघासोबत कोलकाता येथे पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सुंदरच्या जागी याचा संघात समावेश होतो की नाही हे पाहावे लागेल.
तिसरा खेळाडू बाहेर
सुंदर आता थेट बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाईल, जिथे तो त्याच्या दुखापतीवर उपचार करेल. भारताचा धाकड खेळाडू आणि अक्षर पटेल याआधीच सिरीजमधून बाहेर गेले आहेत. राहुल आणि अक्षर देखील टी-20 मालिकेचा भाग होते, परंतु दोघांनाही वेगवेगळ्या कारणांमुळे वगळण्यात आले. दुसर्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान राहुलला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो तिसर्या वनडेत खेळू शकला नाही. त्याचवेळी, अक्षर पटेलला वनडे मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.