विंडिज दौऱ्यात सूर्या तळपला नाही

संघातून डच्चू मिळणार?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडिज दौऱ्यावर चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी निघाली नाही. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 19 धावा, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 24 धावा आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 25 धावा केल्या. मधल्या फळीत तो टीम इंडियाचा कमकुवत दुवा आहे. तो आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे एकदिवसीय संघातून त्यांची हकालपट्टी होऊ शकते.

दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना आशिया कपमध्ये खेळणे कठीण आहे. या दोन्ही खेळाडूंचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन सुरू आहे. या दोन्ही खेळाडूंवर यशस्वी शस्त्रक्रियाही झाल्या आहेत, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप 2023 साठी त्यांच्यासाठी तंदुरुस्त होणे अशक्य आहे. अशा स्थितीत खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या सूर्यकुमार यादवचे आशिया कप स्पर्धेत भारतीय मधल्या फळीत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे, ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे.

सूर्यकुमार यादवन 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 511 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, टी-20 क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी 48 सामन्यांमध्ये 1675 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.

Exit mobile version